जय माता दी...
जोगव्यातून साकारले वैष्णवी दुर्गा मातेचे मंदिर
अध्यक्ष चंद्रकांत सोनवणे महाराज यांनी दैनिक सांजवार्ताशी बोलताना दिली.
उज्ज्वला साळुंके
छत्रपती संभाजीनगरः भक्ती, श्रद्धा आणि सामूहिक एकजुटीच्या बळावर उभे राहिलेले श्री वैष्णवी दुर्गा माता मंदिर संजय गांधी मार्केट परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे. विशेष म्हणजे, देवीचा जोगवा मागून जमा केलेल्या निधीतून या मंदिराची उभारणी करण्यात आली आहे. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने मंदिरात दरवर्षी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
यंदाही ही परंपरा कायम ठेवत मोठ्या उत्साहात नवरात्रोत्सव साजरा करण्यात येत आहे. अशी माहिती मंदीराचे संस्थापक
संजय गांधी मार्केटमधील व्यापाऱ्यांनी एकत्र येत सुरू केलेल्या या उपक्रमाला आज अनेक वर्षांची परंपरा लाभली आहे. धार्मिक उत्सव साजरा करण्याच्या इच्छेतून सुरू झालेला हा प्रवास पुढे मंदिर उभारणीपर्यंत पोहोचला. देवीची आराधना, भजन, धार्मिक विधी अशा उपक्रमांमधून श्रद्धेची परंपरा जपली जात आहे. नवरात्रोत्सवाच्या काळात मंदिरात विशेष धार्मिक वातावरण असते. देवीची पूजा-अर्चा, भजन आणि विविध धार्मिक विधींच्या माध्यमातून भक्तिमय कार्यक्रम पार पडतात. नवरात्रोत्सव हा आदिशक्तीच्या आराधनेचा आणि भक्तिभावाचा उत्सव मानला जातो. या काळात श्री वैष्णवी दुर्गा माता मंदिरातही देवीच्या आराधनेला विशेष महत्त्व दिले जाते.
कन्यापूजन करण्याची परंपरा कायम
नवरात्र उत्सवात भजन आणि विविध धार्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून देवीचा जागर केला जातो. भाविकांना एकत्र आणणाऱ्या या उपक्रमांमुळे मंदिरातील उत्सवाला सामूहिक स्वरूप प्राप्त होते. कन्यापूजन हा नवरात्रोत्सवातील महत्त्वाचा धार्मिक विधी आहे. देवीच्या शक्तीचे प्रतीक म्हणून कन्यांचे पूजन करण्याची परंपरा कायम ठेवली जाते. श्री वैष्णवी दुर्गा माता मंदिरातही दरवर्षी कन्यापूजनाचे आयोजन केले जाते. यंदाही परंपरा कायम ठेवली जाणार आहे. अष्टमीच्या दिवशी होणाऱ्या होमाद्वारे देवीची आराधना केली जाणार असून, नवमीच्या दिवशी भंडाऱ्याच्या माध्यमातून भाविकांना प्रसादाचे वितरण केले जाणार आहे.
अनेक वर्षांपासून साजरा होतो नवरात्र उत्सव
संजय गांधी मार्केटमधील व्यापाऱ्यांनीही आपल्या परिसरात नवरात्रोत्सव साजरा करण्याचा विचार केला. १९८५ या वर्षात येथे नवरात्रोत्सव साजरा करण्यास सुरुवात झाली. मोकळ्या जागेत अगोदर गरबा, नवरात्र उत्सव साजरा केला जात होता. आपल्या परिसरात देवीचे मंदिर असावे आणि भाविकांना नियमितपणे देवीची आराधना करता यावी, अशी भावना व्यापाऱ्यांच्या मनात निर्माण झाली. सुरुवातीच्या काळात श्री वैष्णवी दुर्गा मातेचे मंदिर स्थापन करून देवीची पूजा-अर्चा सुरू करण्यात आली. मंदिर उभारण्याचा संकल्प पूर्ण करण्यासाठी व्यापारी आणि देवीभक्तांनी पुढाकार घेतला. टीव्ही सेंटर आणि हडको परिसरात देवीचा जोगवा मागून निधी जमा करण्यात आला. लोकसहभागातून आणि देवीवरील श्रद्धेतून जमा झालेल्या या निधीतून संजय गांधी मार्केटमध्ये श्री वैष्णवी दुर्गा माता मंदिर उभारण्यात आले.
https:llepaper.sanjwarta.in/Powered By Vrudhee Solutions















